Astrology – July

8

मेष

महत्त्वाची कामे १५ तारखे आधी उरकून घ्या, नवीन व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी योग्य काळ. प्रॉपर्टिची कामे मार्गी लागतील. मंगळ बुध शुक्र शुभ योगात आहेत..
 
महिलांना :  कुटुंबातील सगळ्यांच सहकार्य मिळेल. संगीत क्षेत्रात यश मिळेल अथवा शनी आरोग्याच्या तक्रारी निर्माण करेल.
 
विद्यार्थ्यांसाठी : अध्ययनासाठी गुरुजनांचा सल्ला घ्या.आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी ओम नम: शिवाय। हा मंत्र ११ वेळा म्हणावा.

शुभ दिनांक : २ , ६ , ११ , १७ , २२ , २४ , ३०

11

वृषभ

नोकरीच्या शोधात असाल तर सकारात्मक प्रतिसाद मिळेल, उत्तरार्धात आर्थिक चणचण भासेल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. वाहन जपून चालवा. शनी आरोग्य बिघडवेल.
 
महिलांना :  जोडीदाराच्या प्रकृतीस सांभाळा. घरात मतभेद वाढणार नाहीत ह्याची काळजी घ्या जुन्या कटू आठवणी उगाळणे टाळा.
 
विद्यार्थ्यांसाठी : मित्राकडून सहकार्य मिळेल, लेखनाकडे जास्त लक्ष द्या.

शुभ दिनांक : २ , ५ , ८ , ११ , १७ , २ , २४ , २७ , ३०

10

मिथुन

वृश्चिकेतील शनी चे आगमन आरोग्याच्या तक्रारी वाढवेल, सहकाऱ्याशी संवाद साधा. नवीन व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतील.शेअर मार्केटमध्ये यश मिळेल.
 
महिलांना : पूर्वीच्या मित्र मैत्रिणींच्या भेटीगाठी होतील. नवीन कल्पना सुचतील. कला क्षेत्रांत यश मिळेल. प्रवासाचा योग आहे.
 
विद्यार्थ्यांसाठी: पाठान्तर करण्यापेक्षा लक्षात ठेवण्यासाठी स्मरणशक्ती वाढवा. ओम नमो भागवते वासुदेवाय । मंत्राचा ११ वेळा रोज करा.

शुभ दिनांक : १ , ४ , ६ , ८ , १२ , १८ , २० , २४ , २६ , २८

6

कर्क

प्रलोभनांना बळी पडू नका. पारदर्शकता ठेवा. बोलताना शब्दाकडे लक्ष ठेवा. आप्तेष्ट आणि वरिष्ठांना मान द्या. सहनशीलता महत्त्वाची.

महिलासाठी : पूर्वीच्या चुका पुन्हा होणार नाहीत ह्याची काळजी घ्या, प्रवासात आरोग्याची काळजी घ्या विवाह जुळण्यास उत्तम काळ.
 
विद्यार्थ्यांसाठी : वेळेचं बंधन पाळा, वैचारिक देवाण घेवाण महत्त्वाची.

शुभ दिनांक : १ , ३ , ७ , १२ , १९ , २३ , २७ , २९

5

सिंह

द्वितीयेतील गुरु मार्गी आल्याने आर्थिक प्रश्न मार्गी लागतील. शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीस योग्य काळ.
 
महिलांना: घरातील ज्येष्ठांच्या तब्येती सांभाळा. मान अपमान विसरून कर्तव्य करा. दुसऱ्यांचा विचार केल्यास फायदा होईल.
 
विद्यार्थ्यांसाठी : आरोग्यासंबधी काळजी घ्या. जुने मित्र भेटतील.

शुभ दिनांक : २ , ५ , ८ , १२ , १७ , १९ , २३ , २५ , २९

4

कन्या

अनपेक्षित लाभ संभवतात, मंगळ बुध शुभ योगात आहेत.व्यवसायात,
नोकरीसाठी नवीन संधी उपलब्ध होतील.
 
महिलांसाठी : हस्तकला निपुण महिलांना व्यवसायाचा नव्या संधी उपलब्ध होतील.
 
विद्यार्थ्यांसाठी : शिक्षणसंस्थातील राजकारणात लक्ष देऊ नका.

शुभ दिनांक : २ , ६ , १० , १६ , १९ , २३ , २८ , ३०

9

तूळ

काळानुसार नवीन शिक्षण घेतल्यास नोकरीत नवीन संधी उपलब्ध होतील कोर्ट कचेरीची कामे दुर्लक्षित करू नका.
 
महिलांसाठी :  साडेसाती थोडा काळ पुन्हा डोकं वर काढत आहे शनीची उपासना स्थैर्य आणेल.
विध्यार्थ्यांसाठी : उच्चशिक्षणासाठी प्रयत्नशील राहा.
 
 शुभ दिनांक : १ , ३ , ९ , १२ , १ , १८ , २२ , २६ , २८

3

वृश्चिक

राशीमधील शनीचे आगमन नोकरी व्यवसायात अडचणी निर्माण करेल. घरातील वादविवाद टाळा. जुनी येणी वसूल करा.
 
महिलांसाठी :  प्रेम प्रकरणात यश परंतु बोलताना शब्द जपून वापरा. 
 
विद्यार्थ्यांसाठी : नातेवाईकांकडे मन मोकळं करा, त्यांना तुमच्या अडचणी समजू देत.
शुभ दिनांक : २ , ६ , ७ , १० , १४ , १८ , २१ , २६ , ३०

2

धनु

पाण्यापासून जपा. भलते धाडस करू नका. व्यवसायातील शनी आध्यात्मिक शक्ती वाढवेल. मोठी गुंतवणूक करताना सल्ला घ्या.
 
महिलांसाठी : मानसिक संतुलन सांभाळा. महत्त्वाचे निर्णय पूर्वार्धात घ्या. 
 
विद्यार्थ्यासाठी: आरोग्याकडे लक्ष द्या. मैत्रीत वाद विकोपाला जाणार नाहीत. ह्याची काळजी घ्या. 
शुभ दिनांक : १ , ४ , ६ , १० , १४ , २० , २३ , २७
 

1

मकर

मित्रांचा सल्ला जपून घ्या. कामाच्या तक्रारी , दुखणी वाढतील. सोने – चांदीच्या व्यापारात नवीन संधी मिळतील.

 
महिलांसाठी :  विवाह ठरवण्यास योग्य काळ, नवीन खरेदी कराल.
 
विद्यार्थ्यांसाठी :  स्पर्धा परीक्षांची तयारी करताना. जास्त कष्ट घ्यावे लागतील.
शुभ दिनांक : १ , ३ , ५ , १० , १३ , २२ , २७ , २९

12

कुंभ

कलावंतांना मानसन्मान प्राप्त होईल. धार्मिक प्रवास घडतील. बुध शुक्र अनुकूल आहेत.
 
महिलांसाठी : केलेल्या कष्टाचे फळ मिळण्याचा काळ. आनंदवार्ता समजतील.
विद्यार्थ्यासाठी : परदेशी शिकणाऱ्यांना नवीन संधी उपलब्ध होतील. पण प्रयत्न जोरात करा.

शुभ दिनांक : २ , ३ , ७ , १० , १५ , १७ , २० , २६ , २७ , ३०

7

मीन

इतरांची कामे करण्याबरोबर स्वतः कडे लक्ष द्या. पूर्वीच्या कामाचा मोबदला घ्या. भावनेपेक्षा व्यवहाराला महत्व द्या.
 
महिलांसाठी : आर्थिक उन्नती होईल,नातेवाईकांकडून सहकार्य मिळेल.
 
विद्यार्थ्यांसाठी : परदेशी शिक्षणासाठी स्कॉलरशीप मिळेल. गुरूची उपासना योग्य मार्गदर्शन करेल.
शुभ दिनांक : ३ , ६ , ९ , १० , १३ , १९ , २२ , २५ , २७ , ३०

Horoscope by Anant Vishnu Marathe